tag:blogger.com,1999:blog-30215608320539188432024-03-13T23:34:38.293-07:00मृगोUnknownnoreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-7464640577207171522016-11-30T10:01:00.004-08:002016-11-30T10:01:56.350-08:00दारू
12/02/2012
"सगळ्यांनी बारा वाजता रिवोल्युशन बारमधे जमा!" पावणेबाराला इमेल. आमची पिकोचिप कंपनी नुकतीच एका अमेरिकन कंपनीने विकत घेतली. दोन महिने भवति न भवति होऊन शेवटी डील झाले. दोन कंपन्यांचे मर्जर म्हणजे मोठ्या माशाने छोट्याला गिळणे. नोकर्या जाणार हे नक्कीच. म्हणून आम्ही सगळे छोटे मासेवाले मनातून घाबरलेले. त्यात पुन्हा राजकारण. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोण बळीचा बकरा वगैरे. जिथे Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-45543896703527287642009-05-27T16:46:00.000-07:002009-05-27T16:49:00.824-07:00अवघे पाऊणशे वयोमानपरवा टीव्हीवर ग्रँड डिजाइन्स कार्यक्रमात एका सत्तरीच्या जोडप्याचा नवे घर बांधण्याचा उपक्रम दाखवला. डेव्हिड आणि ग्रीटा. खरंतर त्यांच्याकडे पाहून हे सत्तरच्या पुढचे आहेत असं वाटत नाही. प्रेमळ आजी-आजोबांसारखे दिसतात खरे, पण लवलवता उत्साह दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडतो. सूत्रधार केविनने त्यांना विचारलं की तुम्ही हे 'या वयात' घरबिर बांधायचं कसे काय ठरवलं; तर त्या दोघांच्या उत्तरात वयाचा काही Unknownnoreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-64501981713069986892008-05-11T01:21:00.000-07:002008-05-11T13:25:41.219-07:00इथली तिथली माणसंआज दुपारी बाजारात गेले होते. बाथ गावात शनिवारचा बाजार असतो. तिथे आजुबाजूच्या खेड्यात पिकलेली भाजी, फळे झालंच तर सरबते, लोणची, मुरंबे, खारवलेले मांसाचे प्रकार मिळतात. उघड्यावर मंडई असते तसा प्रकार. तशी एक बंद मडईदेखील आहे. तीही मी आधी बघितली नव्हती. त्या इमारतीची नक्षीदार दारं आमच्या ऑफिसातून दिसतात त्यामुळे तिथे जायची उत्सुकता होती. शिवाय आज हवा मस्त होती. पंचविसापर्यंत तापमान, हलके हलके ढग Unknownnoreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-16669221761938304212008-03-07T12:53:00.000-08:002008-03-08T15:05:42.659-08:00It's got to goघराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच Unknownnoreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-7502364591120513292007-01-31T11:25:00.000-08:002007-01-31T11:44:35.035-08:00नट्सफ़र्ड२००३ सालच्या सप्टेंबर महिन्यात तनुला भेटायला मी नट्सफ़र्डला गेले होते. तनु माझी इंग्लंडमधली पहिली मैत्रिण. मी पोचल्याच्या दुसर्या आठवड्यात ती केंब्रिजला आली होती. माझ्या घराची, बँकेची वगैरे घडी बसवून मला तिच्या घरी नट्सफ़र्डला येण्याचं आग्रहाचं आमंत्रणही देऊन गेली होती. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी जाण्याचे बेत आखायला सुरुवात केली. नट्सफ़र्ड मँचेस्टरजवळचे एक छोटे खेडे आहे. समुद्राकाठी राजशिळेवर बसून Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-64937467175637272482007-01-21T04:14:00.000-08:002007-01-21T04:16:12.688-08:00प्रयोगातून पोळी - २संध्याकाळी, नवे पीठ, नवा उत्साह, नवी आशा अशा नवोन्मेषशालिनी अवस्थेत पुन्हा पोळीप्रयोगांना सुरुवात केली. सुरुवातीलाच घोडे अडले. माझ्या हिशोबाने पुरेसे पाणी घालून झाले तरी पीठ काही नीट भिजेना. थोडे थोडे भिजलेले गट काही केल्या एकत्र येत नव्हते. चार गोळे दामटून एकत्र केल्यावर पाचवा त्यात दामटायला जावे तर एक नवीन गोळा 'आमचा फक्त बाहेरून पाठिंबा' असे म्हणून बाहेर पडत होता. शेवटी चमचा चमचा पाणी वाढवून Unknownnoreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3021560832053918843.post-30837143034404616652007-01-21T04:05:00.000-08:002007-01-21T04:11:18.272-08:00प्रयोगातून पोळी - १उण्यापुऱ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात स्वयंपाक करण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नव्हती. घरी असताना आईला थोडीफार मदत केली होती; अगदीच काही नाही तर स्वयंपाक करताना बघितले तरी होते. बंगलोरात चार वर्षे राहून तीही सवय मोडली. कामावरून आल्यावर आपापल्या खोलीत जाऊन गप्पा टप्पा, नि काकूंची हाक आल्यावर थेट जेवणाच्या टेबलावर. त्यामुळे केंब्रिजला जाऊन आपापला स्वयंपाक करायचा या कल्पनेने मी धास्तावले होते. Unknownnoreply@blogger.com3